भुसावळ नगरपालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फलटणकर यांच्यासह कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या प्रांताधिकारी यांनी दिल्या सूचना निळे निशाण संघटनेने डॉक्टर फलटणकर यांची बदली करण्यात यावी अशी केली मागणी
दि.६ मार्च २०२५ रोजी भुसावळ प्रांत अधिकारी यांनी नगरपालिका रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली त्या प्रसंगी निळे निशाण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर फलटणकर यांच्या कार्यपद्धती संदर्भात नाराजी व्यक्त करून त्यांच्या कार्यकाळाची चौकशी करण्यात यावी व त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी तसेच सर्वसामान्य गोरगरिबांना आरोग्या संदर्भात योग्य औषधोपचार व सन्मानाची वागणूक देण्यात यावी अशी मागणी प्रांताधिकारी यांच्या कडे केली .
त्याप्रसंगी संघटनेच्या जळगांव जिल्हा अध्यक्षा नंदाताई भावटे , जिल्हा उपाध्यक्षा ज्योतिताई पवार , जिल्हा कार्याध्यक्ष ॲड . प्रविण इंगळे , शिक्षण व रोजगार समिति जिल्हा अध्यक्षा निकिता भावटे ,भुसावळ ता . अध्यक्षा निर्मला ताई सुरवाडे ,भुसावळ शहर अध्यक्ष वंदना चव्हाण , मनिषा लोखडे उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा