भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे दि . १३ / ०३ / २०२५ गुरुवार रोजी निळे निशाण संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जळगाव जिल्हा अध्यक्षा नंदाताई भावटे यांच्या अध्यक्षतेखाली व जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष ॲड . प्रवीण इंगळे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकि मध्ये भुसावळ नगर पालिका रुग्णालयाच्या मनमानी कारभार संदर्भात तसेच सर्व सामान्य जनतेच्या मुलभुत समस्या विषय चर्चा करून आंदोलनात्मक भूमिकेतून समस्या सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला त्या प्रसंगी मान्यवर कांशिरामजी यांच्या नेतृत्वावर व निळे निशाण संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन भुसावळ न्यायालयातिल ॲड . प्रिया अडकमोल , ॲड . क्रिष्णा उर्फ उषा सिंग , ॲड . उमेश पानपाटील , सागर गजभिये यांनी संघटनेत प्रवेश केला त्याप्रसंगी शिक्षण व रोजगार समिती जिल्हाध्यक्ष निकिता भावटे , भुसावळ तालुका अध्यक्ष निर्मलाताई सुरवाडे , विभागिय अध्यक्ष लक्ष्मी ताई मेढे , विलास तायडे , मनिषा लोखंडे , मंदा साळवे यांनी संघटनेत प्रवेश करणाऱ्या सर्व वकिलांना पुष्णगुच्छ देऊन स्वागत केले .
टिप्पणी पोस्ट करा