सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या व नगर पालिका रुग्णालय वैदकिय अधिकारी यांचा मनमानी कारभार थांबविणे करिता भुसावळ प्रांतधिकारी यांना दिले निवेदण - दि .६ मार्च २०२५ रोजी रुग्णालयाची करणार पाहणी प्रांताधिकारी यांनी दिले अश्वासन .
आज दि .०३ मार्च २०२५ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने भुसावळ तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या समस्यांचे निवेदण प्रांतधिकारी भुसावळ यांना देण्यात आलेल्या निवेदणात विषय
भुसावळ शहरातील सर्व सामान्य जनते करिता ट्रामा सेंटर ( शासकिय रुग्णालय ) व नगर पालिका शासकीय रुग्णालय असून त्या रुग्णालयात अवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात यावे .
१ ) गर्भवती महिलांची प्रसृती दरम्यान शस्त्रक्रिया ( सिझर ) करण्याची आवश्यकता असल्यास तात्काळ व्यवस्था करण्यात यावी .
२ ) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यान्वीत करण्यात यावी .
३ ) रक्त पेढी सुरू करण्यात यावी .
४ ) भुसावळ शहरात नाहटा कॉलेज ,आठवडे बाजार , बस स्टॅड , यावल नाका या परिसरात तात्काळ महिलां करिता स्वच्छतागृह उभारण्यात यावे .
५)भुसावळ शहरात डि . एस . विद्यालय प्रांगणाला डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्यात आले परंतु आज पावेतो डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचे फलक लावण्यात आले नाही तरी दि . ३१ मार्च २०२५ पर्यंत डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचे फलक लावण्यात यावे .
६ )आर . पि . डि .रोडला डॉ . बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नांवाचे फलक लावण्यात यावे .
७ )तापी नदिच्या पुलावर संरक्षणार्थ जाळी बसविण्यात यांवी .
८ ) भुसावळ नगर पालिका रुग्णालयात नियमबाह्य पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून वैदकिय अधिकारी डॉ . फलटणकर यांची तात्काळ बदली करण्यात यावी .
असे निवेदण देण्यात आले त्याप्रसंगी निळे निशाण सामाजिक संघटनेचे जळगांव जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे , जिल्हा कार्याध्यक्ष ॲड . प्रविण इंगळे जिल्हा उपाध्यक्षा ज्योतीताई पवार , शिक्षण व रोजगार जिल्हा अध्यक्षा निकिता भावटे , शिक्षण व रोजगार समिति जिल्हा उपाध्यक्षा मनिषा लोखंडे , भुसावळ तालुका अध्यक्षा निर्मलाताई सुरवाडे , भुसावळ शहर अध्यक्षा वंदनाताई चव्हाण , विभागीय अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे व इतर महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा