आज दि .२९ जानेवारी २०२५ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या महिला आघाडिच्या वतिने रावेर तहसिलदार यांना निवेदण देण्यात आले निवेदणात नमुद करण्यात आले कि रावेर शहरात महिलांकरिता स्वच्छता गृह नसल्याने महिलांचे हाल होत असुन तारांबळ उडत आहे या संदर्भात वारंवार रावेर नगरपालिकेला निवेदण दिले परंतु आज पावेतो आमच्या महिलांच्या समस्यांचे निवारण झालेले नसुन आपण तात्काळ आमच्या समस्यांचे निराकरण करावे अन्यथा महिलांच्या स्वच्छतागृह उभारण्याच्या उद्देशाने महिलांच्या सन्मानार्थ आंदोलन करण्यात येईल असे निवेदणात नमुद करण्यात आले त्याप्रसंगी माहला आघाडी रावेर शहर अध्यक्ष सुनिताताई वाघ , रावेर सर्कल अध्यक्ष कविताताई वाघ , खिर्डी सर्कल अध्यक्ष मनिषाताई वानखेडे , खिरोदा सर्कल अध्यक्ष उज्वलाताई वाघ , जानकाबाई सपकाळे , रेखाबाई तायडे , पदमबाई तायडे व असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या .
टिप्पणी पोस्ट करा