यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी जाणिवपुर्वक भालशिव ग्रा. पं . अंतर्गत टेंभीकुरण गावातील अनु . जाती / जमातीच्या लोकांना आपल्या मुलभूत हक्कांपासून दूर ठेवून जातिय व्देषाने वैठिस धरल्या प्रकरणी तसेच दहिगाव - सावखेडा येथिल रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल प्रकरणी केलेली अनियमितता व गैरप्रकार यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या करिता दि .०३ ऑक्टोंबर २०२४ पासून संघटनेच्या वतिने शेकडो महिला - पुरुषांनि ठिय्या आंदोलन सुरू केले परंतु गटविकास अधिकारी यांनी तथ्य नसलेल्या उडवाउडवीची उत्तर दिल्यामुळे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी अमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेऊन दि. ०५ ऑक्टोंबर २०२४ रोजि सुरू असलेले ठिय्या आंदोलनाचे रूपांतर आमरण उपोषणात केले तरी शासन - प्रशासनाने उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नसून संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांची प्रकृती खालावलेली असुन याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन प्रशासनाने तात्काळ दलित - आदिवासी समाजाच्या लोकांवर जाणिवपुर्वक अन्याय करणाऱ्या दोषींवर कारवाई करून दलित - आदिवासींना न्याय दयावा ही विनंती
दलित आदिवासी समाजावर जाणिव पुर्वक अन्याय करणाऱ्यांचा जाहिर निषेध ! असे निवेदन भुसावळ, रावेर,चोपडा,१)म . तहसिलदार साहेब रावेर कापसे साहेब यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे , अक्षय तायडे , उदय वाघ , पंकज तायडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .
२)म . तहसिलदार साहेब चोपडा यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी चोपडा तालुका अध्यक्षा अनिता बाविस्कर , चोपडा शहर अध्यक्षा बबिता बाविस्कर , शहर उपाध्यक्षा कल्पना अहिरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .
३)म . तहसिलदार साहेब भुसावळ यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा नंदा भावटे , भुसावळ तालुका अध्यक्षा निकिता भावटे , ता . उपाध्यक्षा मनिषा लोखंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा