यावल तालुक्यातील अनु . जाती / जमातीच्या लोकांचा जाणिवपुर्वक मानसिक छळ करून त्यांना त्यांच्या हक्का पासून वंचित ठेवणाऱ्या यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करा.निळे निशाण संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष यांचे आमरण उपोषण

यावल तालुक्यातील अनु . जाती / जमातीच्या लोकांचा जाणिवपुर्वक मानसिक छळ करून त्यांना त्यांच्या हक्का पासून वंचित ठेवणाऱ्या यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून अनु . जाती / जमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता दि . ०५ ऑक्टोबर २०२४ पासून पंचायत समिती कार्यालया समोर निळे निशाण संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांचे आमरण उपोषणास प्रारंभ
      यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी जाणिवपुर्वक तालुक्यातील काही गावाच्या अनु . जाती / जमातीच्या लोकांना जातीय व्देष भावनेतून त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम गटविकास अधिकाऱ्यांने केले आहे त्याच्या निषेर्धात निळे निशाण संघटनेच्या वतीने दि . ०३ ऑक्टोबर २०२४ पासून संघटनेचे संस्थाकप / अध्यक्ष यांच्या उपस्थितीत अनु . जाती / जमातीच्या शेकडो महिलांनी पंचायत समिती कार्यालया समोर रात्रंदिवस ठिय्या आंदोलन सुरू केले . दि . ०४ ऑक्टोंबर २०२४ रोजी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन चर्चा करण्यांचा प्रयत्न केला परंतु संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे अधिकारी निरुत्तर होऊन अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे होणारी चर्चा संपुष्टात आली त्याअनुषगांने अनुसुचित जाती / जमातिच्या जिवघेण्या समस्याकडे शासन प्रशासनाचे लक्ष केंद्रित होईल व अनुसुचित जाती / जमाति च्या लोकांचा जाणिव पुर्वक मानसिक छळ करणाऱ्या जातियवादी मानसिकतेच्या गटविकास अधिकारी व इतर संबंधीत व्यक्तीवर शासन प्रशासनाने शासकिय सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करून अनुसुचित जाती / जमातिचे लोकांना न्याय द्यावा यासाठी ठिय्या आंदोलनांचे रूपातंर आमरण उपोषणात करण्यात आले त्या अनुषगांने संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी दि . ०५ ऑक्टोंबर २०२४ पासून स्वतः आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला तसेच लवकरच अनु . जाती / जमातिला न्याय न मिळाल्यास संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे व यावल तालुका महिला आघाडी अध्यक्षा मनिषा बागुल यांनी दिली .

0/Post a Comment/Comments