दि.०३/०९/२०२४ पासून निळे निशाण संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू. यावल पंचायत समितिच्या मनमानी कारभामुळे दलित आदिवासी समाजाचे लोक आपल्या हक्कापासून वंचित.
यावल पंचायत समितिच्या मनमानी कारभामुळे दलित आदिवासी समाजाचे लोक आपल्या हक्कापासून वंचित यावल तालुक्यातील भालशिव ग्रा . प . अंतर्गत टेंभीकरण या गांवात आजही फक्त अनुसुचित जाती / जमातीचे लोक राहत असुन त्यांना शासनाने कुठल्याही मुलभुत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत तसेच त्या गांवाचे ग्रामसेवक दलित आदिवासींना कुठल्याही प्रकारचे दाखले अथवा प्रस्ताव देत नाहीत तसेच यापूर्वी आमचे कडुन प्रत्येक वर्षाला तत्कालीन ग्रामसेवक आमचेकडून ग्रामपंचायत कर वसुल करित होते परंतु द्वेषभावनेने प्रेरित झालेल्या विद्यमान ग्रामसेवक जाणिव पुर्वक दलित आदिवासींना आपल्या मुलभुत हक्कापासुन वंचित ठेवले आहे त्या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून अनेक वेळेस आंदोलन केले लेखी स्वरूपात निवेदण दिले परंतु जाणिव पुर्वक टेंभीकरण गांवातिल दलित आदिवासी समाजाच्या समस्या कडे दुर्लक्ष करण्यात आले आहे तसेच दहिगाव सावखेडे येथील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकरणात झालेल्या अनियमितता व गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी व दोषी व्यक्ती विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी . या मागणिकडे जाणिव पुर्वक पंचायत समितीच्या वतीने दुर्लक्ष करण्यात आले त्यानुषंगाने निळे निशाण संघटनेच्या वतीने दि . ०३ ऑक्टोबर २०२४ पासुन पंचायत समिती कार्यालय यावल येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाची शुरुवात करण्यात आलेली आहे तरी आम्हाला दोन दिवसात समाधान कारक उत्तर न मिळाल्यास दि . ०५ ऑक्टोबर २०२४ पासून ठिय्या आंदोलनाचे रूपांतर अमरण उपोषणात करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी असे निवेदण देण्यात आले त्या प्रसंगी संघटनेचे अनेक महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा