निळे निशाण संघटना भुसावळ तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न बैठकित ॲड . प्रविण इंगळे यांच्यासह अनेकांनी संघटनेत केला प्रवेश .

निळे निशाण संघटना भुसावळ तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न बैठकित ॲड . प्रविण इंगळे यांच्यासह अनेकांनी संघटनेत केला प्रवेश . 
     दि.०८ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी भुसावळ शासकिय विश्राम गृह येथे भुसावळ तालुका कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला जिल्हा अध्यक्षा नंदाताई भावटे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ॲड . प्रविण इंगळे तसेच असंख्य महिला वर्ग व तरुण वर्गाने संघटनेत प्रवेश केला .
        बैठकीच्या यशस्वितेसाठी भुसावळ तालुका अध्यक्षा निकिताताई भावटे , तालुका उपाध्यक्षा मनिषा लोखंडे , तालुका संपर्क प्रमुख मंदाताई सावळे यांनी परिश्रम घेतले या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम , प्रा . प्रकाश मोरे , महेंद्र महाले , सुकदेव सोनवणे , माया शंभरकर , बारसके ताई व इतर कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments