जळगाव - बनावट सेंद्रिय खताचा साठा जप्त

जळगाव -नांद्रायेथील शुक्रवारी जळगाव जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांद्रा, ता. जळगाव येथे गुजरात राज्यातील खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी धीरज बढे, मंडळ कृषी अधिकारी अमित भोसले यांच्या पथकाने पाळत ठेवून ट्रक मधून मे. जेनिक केमटेक कॉर्पोरेशन कंपनीचे नाव लिहिलेल्या सेंद्रिय खताच्या १५२ गोण्या शेतकऱ्यांच्या बांधावर उतरवत असताना छापा टाकून जप्त केल्या.

0/Post a Comment/Comments