रावेर तालुक्यात हातभट्टी दारू विक्री येत्या दोन दिवसात बंद झाली नाही तर सावदा पोलिस स्टेशन समोर महिला करणार बेमुदत ठिय्या आंदोलन .

रावेर तालुक्यात हातभट्टी दारू विक्री येत्या दोन दिवसात बंद झाली नाही तर सावदा पोलिस स्टेशन समोर महिला करणार बेमुदत ठिय्या आंदोलन . 
 
रावेर तालुक्यातील सावदा पो . स्टे . च्या हददीत वाघोदा बु . व उदळी या गांवात गेल्या काही वर्षांत हातभट्टी दारुमुळे बौद्ध समाजात अनेक महिला विधवा झाल्या . अनेक वृद्ध निराधार झाले . अनेक बालके अनाथ झाले . अनेकांचे संसार उद्धवस्त झाले . तरी या गांवातिल दारू विक्री बंद होत नाही त्या अनुषगांने उदळी व वाघोदा बु . येथिल निळे निशाण संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी हातभट्टी दारू विक्री बंद करण्याचा संकल्प केला व सावदा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक अमोल गर्जे यांना निवेदण दिले व येत्या दोन दिवसात दारू विक्री संदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा दि . ४ ऑक्टोंबर २०२४ पासुन निळे निशाण संघटनेच्या शेकडो महिला सावदा पोलिस स्टेशन समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करतिल अशि माहिति निळे निशाण संघटनेच्या रावेर तालुका अध्यक्षा उज्वला वाघ यांनी दिली

0/Post a Comment/Comments