आपल्या पोलिस स्टेशन हद्दीतील मोठा वाघोदा , उदळी , खिरोदा प्र . यावल या गांवातील बौध्द वाडया - वस्त्यातील विषारी हातभट्टी दारू बंद करून उध्वस्त होणारे संसार तसेच बौध्द समाजातील तरुण पिढी वाचवण्यास सहकार्य करावे तसेच मोठा वाघोदा , उदळी , खिरोदा प्र . यावल येथिल बिट हवालदारांना सुचना देऊन तेथील विषारी हातभट्टी दारू बंद करावी.
आपल्या निदर्शनास येईल या उद्देशाने सांगु ईच्छीतो कि संबंधीत बिट हवालदार हे हातभट्टी दारू विक्रेत्यांना नांवानिशी ओळखत असुन काही दारू विक्रेते विधवा महिलांची तर काही अपंगत्वाची कारणे दाखवून दारू विक्री करून अनेकांचे संसार व आयुष्य उध्वस्त करून अनेकांच्या मृत्युस कारणीभुत आहेत तरी आपण संबंधीत बिट हवालदार यांना सुचना देऊन त्वरित हातभट्टी दारू विक्री बंद करावी जेणे करून भविष्यात कोणाची जिवित हानी होणार नाही तसेच हातभट्टी दारुमुळे कोणाची जिवित हानी झाल्यास संबंधीत बिट हवालदार जबाबदार राहतिल कृपया याची नोंद घ्यावी असे निवेदन महिला आघाडी तालुका अध्यक्षा उज्वला वाघ यांनी सहा . पोलिस निरिक्षक विशाल पाटील साहेब सावदा यांना दिले त्याप्रसंगी ता . सचिव कविता शिंदे व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या .
टिप्पणी पोस्ट करा