जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निंभोरा बुद्रुकच्या सरपंच यांना केले अपात्र
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निंभोरा बुद्रुकच्या सरपंच सचिन सुरेश महाले यांना ठरलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अपात्र केले आहे. महाले यांच्याविरोधात संदीप तुकाराम महाले यांनी तक्रार दाखल केली होती. या ग्रामपंचायतीच्या २०२१ मध्ये निवडणुका झाल्या. महाले हे अनुसूचित जाती जमाती (एसटी) संवर्गातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. दरम्यान, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर महाले यांची सरपंचपदी वर्णी लागली. सरपंच असताना त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते.
टिप्पणी पोस्ट करा