यावल ग्रामिण रुग्णालयात तात्काळ कायमस्वरूपी डॉक्टराची नेमणुक करण्यात यावी तसेच तालुक्यातील दलित - आदिवासी समाजा वर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ निळे निशाण संघटनेचा मोर्चा तात्काळ न्याय न मिळाल्यास भविष्यात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करणार .
१ ) ग्रामिण रुग्णालय यावल चे वैदकिय अधिक्षक यांनी शासनाची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने दिलेल्या लेखी पत्राची चौकशी करण्यात यावी .
२) यावल ग्रामिण रुग्णालयात कायम स्वरूपी विविध तज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात यावी .
३) प्रसुती करिता आलेल्या महिलेस सिझर करण्याची गरज असल्यास तात्काळ सिजर करण्याची व्यवस्था करण्यात यावी .
४) यावल ग्रामीण रुग्णालय येथे तात्काळ स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचीया नेमणूक करण्यात यावी .
५) आपातकालिन समयी तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी .
६) नवजात शिशु यांचे अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात यावे .
७) नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू करण्यात याव्या .
८) तालुक्यातील धुळेपाडा व टेंभीकुरण या गांवातील दलित - आदिवासी समाजाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेऊन त्यांना त्यांच्या हक्कापासुन वंचीत ठेवल्या प्रकरणी तसेच टेंभीकुरण गांवाच्या संदर्भात म.आयुक्त नाशिक यांच्या अधिसुचनांची अमंलबजावणी न केल्यामुळे यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे विरुद्ध कारवाई करण्यात यावी . यांचे सह तालुक्यातील अनेक समस्यांचे निवेदन सघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले . तसेच येत्या आठ दिवसात मागण्या पुर्ण न झाल्यास तहसिलदार कार्यालय यावल येथे संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमुद करण्यात आले त्या प्रसंगी जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे , जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम , फैजपुर विभागीय उपाध्यक्ष इकबाल तडवी व अनिल इंधाटे , यावल तालुका युवक अध्यक्ष सागर तायडे , मांगीलाल भिलाला , नानु बारेला , मिलीद सोनवणे , इंदिरा भिलाला , सपना सोनवणे , मनिषा बागुल , विजया सोनवणे , दिपक मेढे , रविंद्र मेढे , अनिल तायडे , जगन तायडे व असंख्य महिला - पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा