निळे निशाण संघटनेच्या वतीने महिलांच्या तसेच सर्व सामान्य जनतेच्या समस्यांच्या व महाराष्ट्र राज्यातील बदलापुर चोपडा व इतर अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी संदर्भात निदर्शने आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय समोर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील बदलापुर चोपडा व इतर अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी . या प्रमुख मागणिसह जळगांव जिल्ह्यातिल रावेर , यावल , चोपडा , भुसावळ तालुक्यातिल महिलांसह सर्व सामान्य जनतेच्या संदर्भात गेल्या दोन महिन्या पासुन रावेर , यावल , चोपडा , भुसावळ , जळगांव येथिल तालुका स्तरावर महाशय तहसिलदार यांना तालुक्यातिल महिला व सर्व सामान्य जनतेच्या समस्यांच्या संदर्भात निवेदण दिले आंदोलन केले परंतु महिलांना न्याय मिळालेला नाही.
तालुक्यातिल सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असुन भविष्यात कधीही जिवितहाणी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण निवेदणात खाली नमुद असलेल्या विषयांचा सहानुभुती पुर्वक विचार करून सर्व सामान्य व्यक्ती व महिलांना न्याय द्यावा.
१) रावेर , यावल , चोपडा , भुसावळ , जळगांव तालुक्यातिल अन्न सुरक्षा योजनेच्या यादीची चौकशी करून अपात्र व्यक्तींची नावे कमी करून खरोखर गरजु पात्र विधवा , परितक्ता , घटस्फोटित , अंध , अपंग व निराधार व्यक्तींना अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत तात्काळ समाविष्ट करण्यात यावे .
२) भुसावळ व यावल तालुका स्तरावरिल रुग्णालयात गर्भवती महिलांच्या सुरक्षेचा विचार करून कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात यावी .
२ ) गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी प्रसुती करिता आलेल्या महिलांच्या उपचारा करिता तात्काळ तज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात यावी ..
३ ) रावेर , भुसावळ , जळगांव , चोपडा , यावल येथे महानगर पालिका / नगर पालिकेने महिलांकरिता ठिकठिकाणी तात्काळ प्रसाधन गृह उभारावे .
४ ) जळगांव भुसावळ तालुक्यातिल औद्योगिक वसाहतीत असलेल्या खाजगी कंपनीत तसेच विजनिर्मिती केंद्र भुसावळ येथे परप्रांतातुन पोटभरण्यास आलेल्या कंत्राटी स्वरूपाच्या कामगारांची कंत्राटदार यांच्याकडून होत असलेली पिळवणुक थांबवून खाजगी कंपन्या व विजनिर्मिती केंद्र दिपनगर या ठिकाणी स्थानिक बेरोजगारांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून द्यावा .
५) महानगर पालिका / नगर पालिका क्षेत्रात अनेक बेघर भुमिहीन गरजु व्यक्तींना रहिवास करिता हक्काची जागा देण्यात यावी तसेच पात्र लाभार्थी यांना प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही तरी त्याची चौकशी करून नगर पालिका क्षेत्रात अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या बेघर भुमिहिनांना जागेसह प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा .
६ ) रावेर , यावल , चोपडा , भुसावळ , जळगांव तालुक्यात ज्या गांवामध्ये बौद्ध समाजाच्या वाडया वस्त्यांमध्ये हातभट्टी दारू विक्री होत असेल त्या हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध भारतिय न्याय संहिता चे कलम १२३ प्रमाणे कारवाई करण्यात यावी .
७) महानगर पालिका /नगर पालिका हद्दीत व ग्रामिण भागात काही स्वार्थी व्यक्तींनी महसुल विभागाची दिशाभुल करून शासनाच्या नियम अटींचे उल्लंघन करून कुठल्याही प्रकार च्या मुलभुत सुविधा रस्ते लाईट गटारी न करून देता प्लॉट विक्री केली आहे तसेच शासनाची दिशाभुल करून नगर परिषदेच्या दप्तरी नोंद करून घेतलेली आहे असे बेकायदेशिर कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर शासनाची दिशाभुल करून सर्व सामान्यांची फसवणुक केल्या प्रकरणी कारवाई करण्यात यावी तसेच विक्री केलेल्या लेआऊट मध्ये रस्ते व गटारी बांधुन देण्याचे आदेश निर्गमीत करावे .
८) यावल तालुक्यातीलटेंभी कुरण व धुळे पाडा या गावात पूर्णता दलित आदिवासी समाजातून महाशय गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल यांनी जाणीवपूर्वक दलित आदिवासी समाजाला आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवलेले आहे तरी व धुळे पाडा या गावातील दलित आदिवासी समाजाला येण्या जाण्याकरिता तात्काळ रस्ते व पिण्याचे पाणि याची व्यवस्था करण्यात यावी .
त्याअनुषंगाने निवेदणात नमुद केलेल्या रावेर , यावल , चोपडा , भुसावळ , जळगांव तालुक्यातिल महिलां व सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांकडे महाशय जिल्हाधिकारी सो जळगांव यांनि लक्ष केंद्रित करून न्याय द्यावा असे निवेदन देण्यात आले.
निवेदण देतांना निळे निशाण संघटनेचे उपस्थित पदाधिकारी नंदाताई भावटे जळगांव जिल्हा प्रमुख गिता वाघ जळगांव ता . अध्यक्षा अनिता बाविस्कर चोपडा ता . अध्यक्ष विलास तायडे यावल ता अध्यक्ष
टिप्पणी पोस्ट करा