रावेर तालुक्यातील ऐनपुर गांवात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निळे निशाण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन
रावेर तालुक्यातील ऐनपुर गांवात दि . ३१ जुलै २०२४ रोजी गांवात दोन जातित तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने गांवात लावलेल्या बॅनरवर अनेक महापुरुषांच्या पैकी फक्त महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ला चिखल फासुन काही माथेफिरू निच प्रवृत्तीचा परिचय दिला परंतु पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला परंतु हे नीच कृत्यकोणी केले व त्याच्यामागे नेमकं कोण आहे याची चौकशी करून त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन निळे निशाण संघटनेच्या ऐनपुर शाखेच्या महिला कार्यकर्त्यांनी फैजपुर विभागाचे डीवायएसपी तसेच प्रांत अधिकारी फैजपुर यांना दिले त्याप्रसंगी चंबाबाई अवसरमल , निर्मला वाघोदे , सयाबाई इंगळे , बसंताबाई तायडे , बेबाबाई तायडे व इतर असंख्य महिला उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा