निळे निशाण संघटनेच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना सन २०२४ / २५ मध्ये जनहिताचे कार्य करण्याच्या अधिसुचना जाहिर.
आज दि .०१ ऑगस्ट २०२४ रोजी शासकिय विश्राम गृह जळगांव येथे संपन्न झालेल्या बैठकित संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांनी संघटनेच्या माध्यमातुन जळगांव जिल्हातील सर्व सामान्य जनतेचे हित जोपासण्याचा संकल्प करून अधिसुचना जाहिर केल्या आहेत त्याअनुषगांने आपण आपल्या कार्यक्षेत्रात खालिल प्रमाणे नमुद केलेल्या विषयांची आपण आपली नैतिक जबाबदारी व धार्मिक दायीत्व समजुन अंमलबजावणी कराल हि अपेक्षा संघटनेच्या महिला आघाडी जळगांव जिल्हा अध्यक्षा नंदा भावटे यांनि व्यक्त केल्या
१) अनुसुचित जातीच्या विद्यार्थी / विद्यार्थीनी यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती संदर्भात माहिती घेऊन विद्यार्थी / विद्यार्थीनींना शिक्षण घेत असतांना अडचण येणार नाही त्या करिता शिष्यवृत्ती मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावे .
२) आपल्या कार्यक्षेत्रातील विधवा , परितक्ता , घटस्फोटित , अंध , अपंग व निराधार व्यक्तींना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवुन दयावा .
३) तालुका स्तरावरिल रुग्णालय व गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सर्व सामान्य जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल याकरिता प्रयत्न करावे.
४) आपल्या कार्यक्षेत्रातील बेरोजगारांना खाजगी कंपन्या व विजनिर्मिती केंद्र या ठिकाणि स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल या करिता प्रयत्न करणे .
५) महानगर पालिका / नगर पालिका क्षेत्रात बेघर भुमिहिनाना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणे .
६) महानगर पालिका / नगर पालिका या क्षेत्रात महिलान करिता ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारण्या करिता सातत्याने पाठपुरावा करणे .
७ ) आपल्या कार्यक्षेत्रात बौद्ध समाजाच्या वाडया वस्त्यांमध्ये विक्री होत असलेली हातभट्टी दारू बंद करणे कामी पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने प्रयत्न करणे .
या अधिसुचनेचे पत्र विभागीय अध्यक्ष , तालुका अध्यक्ष , शहर अध्यक्ष यांना जिल्हा अध्यक्ष नंदा भावटे यांनी दिले त्याप्रसंगी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास बोरिकर , जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम यांचे सह जळगांव जिल्ह्यातिल सर्व शहर . तालुका . व विभागीय अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा