ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी
कर्तव्यात कसूर केल्याप्रकराणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अथिकारी अंकित यांनी बुधवारी २६ जून रोजी दुपारी ३ वाजता काढले आहे. याकारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवक मिलिंद मिठाराम बाऊस्कर यांनी पदावर कार्यरत असताना
मासिक ग्रामनिधीची रक्कम परस्पर खर्च करून अपहार
करणे, इत्यादीप्रमाणे अनियमतता केल्याचे चौकशीअंती
दिसून आले आहे. 

0/Post a Comment/Comments