रावेर ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा तसेच रावेर शहरात महिलांकरित ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारावे अशा अनेक विषयांवर दिले तहसीलदार यांना निवेदन मागण्या मान्य न झाल्यास महिलांच्या सन्मानार्थ तिव्र स्वरूपाचे आंदोलन करणार निळे निशाण संघटना

रावेर ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा तसेच रावेर शहरात महिलांकरित ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारावे अन्यथा सर्व सामान्य जनतेच्या व महिलांच्या सन्मानार्थ तिव्र स्वरूपाचे आंदोलन करणार - निळे निशाण संघटना
      
    रावेर तालुक्यातील व शहरातील सर्व सामान्य जनतेच्या विविध प्रकारच्या समस्या कडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधून समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमच्या निवेदणात खालील प्रमाणे नमुद केलेल्या विषयांचा शासनाने गांभीर्याने विचार करावा.
           
१ ) रावेर न.पा ने रावेर शहरात बुऱ्हाणपुर - अंकलेश्वर रोड लगत आठवडे बाजार परिसर , गांधी चौक , तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक ते ग्रामिण रुग्णालय रावेर या परिसरात महिलांकरिता स्वच्छतागृह उभारण्यात यावे .  
२ ) रावेर ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा . 
३ ) विधवा , परितक्ता , घटस्फोटीत , अंध - अपंग , निराधार यांना तात्काळ अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा .
४ ) रावेर शहरातुन गेलेल्या बुऱ्हाणपुर - अंकलेश्वर राज्य मार्गाचे नाम करण करून त्याला डॉ . बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नांव देण्यात यावे . 
   ५ ) डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते पंचायत समिती कार्यालय पर्यंत खराब झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी . 
         वरिल नमुद असलेले विषय हे अतिशय महत्वाचे असून आम्ही वारवांर शासन प्रशासनाकडे या संदर्भात मागणी केलेली आहे तरी आमच्या मागण्या कडे दुर्लक्ष करण्यात आले आहे तरी आमच्या मागण्या तात्काळ मान्य करून आम्हाला जनहिताचे कार्य करण्यास प्रोत्साहित करावे .
          आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास आम्हाला जनहितार्थ तसेच महिलांच्या सन्मानार्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल कृपया याची नोंद घ्यावी असे निवेदन म . तहसिलदार रावेर व न . पा . मुख्य आधिकारी रावेर यांना देण्यात आले त्याप्रसंगी संघटनेचे जि . उपाध्यक्ष सदाशिव निकम , रावेर तालुका उपाध्यक्ष बाळु निकम , रावेर तालुका महिला आघाडी उपाध्यक्षा ज्योस्तना संन्यास , म . अ सल्लागार चंबाबाई अवसरमल , निळे निशाण असंघटीत कामगार संघाचे विश्वस्त विकास अटकाळे , अजय मेढे , प्रमोद सोनवणे , योगेश महाजन , बसंताबाई तायडे , सयाबाई इंगळे व असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते निवेदण देते समयी उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments