ग्रामिण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्यामुळे गर्भवती महिलांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे त्यामुळे भविष्यात जिवितहाणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण तात्काळ भविष्यात होणारी जिवीतहाणी टाळणे असे निवेदण तहसिलदार यावल यांना देण्यात आले .
आंदोलनाचे मुख्य विषय .
१) गर्भवती महिलांच्या प्रसुतीच्या वेळी सिजर ची आवश्यकत भासल्यास तात्काळ व्यवस्था करण्यात यावी .
२) नवजात शिशू करिता अतिदक्षता विभाग कार्यान्वीत करणे .
३ ) कुटंब नियोजन शस्त्रक्रिया शुरुवात करण्यात यावी .
४ ) शस्त्रक्रिया गृह कार्यान्वीत करण्यात यावे .
५ ) शवविच्छेदन गृहामध्ये शव सुरक्षे करिता शितकालिन व्यवस्था करण्यात यावी .
६ ) नेत्र चिकित्सक तज्ञांची नेमणुक करून चिकित्सा करून .
७ ) रुग्णवाहीका वेळेवर उपस्थिती करिता उपाय योजना करण्यात यावी .
८ ) आपातकालिन समयी रक्ताची गरज असते त्या एखाद्याचा जिवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो त्याकरिता रुग्णालयात रक्तपेढी ची स्थापना करण्यात यावी .
महोदया ,
यावल तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असुन अनेक वेळेस तात्काळ आरोग्य सेवेची गरज असते त्यामुळे शासन प्रशासनाने या जनहिताच्या मागणिकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा संघटनेच्या वतीने भविष्यात तिव्र स्वरूपाच आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी हि विनंती
त्या प्रसंगी संघटनेच्या महिला आघाडी जळगाव जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांच्या प्रमुख उपस्थितीत फैजपुर विभाग उपाध्यक्ष अनिल ईंधाटे , तालुका अध्यक्ष विलास तायडे , लक्ष्मीताई मेढे , निकिता भावटे . मनिषा लोखंडे . मंदा साळवे . उपाध्यक्ष इकबाल तडवी , दिपक मेढे ,संजय तायडे , जितेंद्र तायडे , अनिल तायडे , सागर तायडे , जगन तायडे , व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा