निळे निशाण संघटना महिला आघाडीच्या आंदोलनाला यश ऐनपुर गांवातिल दारू विक्रेत्यांची झाली धावपळ ऐनपुर गांवात हातभट्टी दारू विक्री बंद . दि.२५ जुलै २०२४ रोजी फैजपूर प्रांतकार्यालय समोर दोन दिवसापासून निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते.रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील हातभट्टी दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई व्हावी या करिता आंदोलन सुरू करण्यात आले होते.
दि.२६जुलै २०२४ रोजी निभोरा पोलीस स्टेशन चे ए.पी.आय.बोचरे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार फैजपुर प्रांताधिकारी कार्यालया तर्फे निंभोरा पोलिसांना ऐनपुर गांवात हातभट्टी . दारू विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश देण्यात आले.त्या अनुषंगाने निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन हे तात्पुरता स्तगित करण्यात आले .
टिप्पणी पोस्ट करा