फैजपूर प्रांतकार्यालय समोर रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील दारूविक्री करणाऱ्या व लज्जास्पद कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी या करिता मुसळधार पावसात निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडीचे ठिय्या आंदोलन.

  फैजपूर प्रांतकार्यालय समोर रावेर तालुक्यातिल निंभोरा पोलिस स्टेशन हददीत ऐनपुर गांवातील हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या गुंडांच्या टोळ्या कडून दारू विक्री विरुद्ध बोलणाऱ्या महिलांना जिवे मारण्याच्या धमक्या तसेच लज्जास्पद शिविगाळ व जाणिवपुर्वक महिलांसमोर येऊन लज्जास्पद कृत्य करणे या भिती मुळे स्वतःला सुरक्षा व आपला सन्मान आबादीत राहावा तसेच त्या दारूविक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी यासाठी वारंवार निंभोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली तसेच पोलिस स्टेशन समोर महिलांनी आंदोलन केले तसेच अप्पर पोलिस अधीक्षक मॅडम यांना निवेदण हि दिले परंतु ऐनपुर गांवातिल दारू विक्री करणाऱ्यांना काही फरक पडला नाही परंतु आम्ही तक्रारी केल्याबद्दल त्या दारू विक्री करणाऱ्या गुंडाना तक्रारी करणाऱ्या महिलांचा राग आला त्यामुळे त्या गुंडांनी त्यांच्या सर्व मर्यादा ओलांडत महिलांचे गांवात जिवन जगणे कठीण केले त्यामुळे आपल्या जिवाच्या व इज्जतिच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दि . २५ जुलै २०२४ पासुन अनेक महिलांनी फैजपुर ता . यावल येथे प्रांताधिकारी कार्यालया समोर या पावसाळ्यात उघडयावर जो पर्यंत ऐनपुर गांवातील दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन आंदोलनास शुरुवात केलेली आहे तरी शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा महिलांच्या सन्मानार्थ निळे निशाण संघटनेच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments