दि .०९ जुलै २०२४ पासुन उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथिल डॉक्टरांच्या दिरंगाई व कर्तव्यात कसुर केल्याच्या निषेधार्थ निळे निशाण संघटनेच्या वतीने चोपडा तालुका अध्यक्षा अनिताताई बाविस्कर व शहर अध्यक्षा बबिता बाविस्कर यांच्या नेतृत्वा खाली सुरू असलेल्या आंदोलना मुळे संबंधीत डॉक्टरांना चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथुन कार्यमुक्त करण्यात आले असल्याचे लेखी पत्र वैदकिय अधिक्षक डॉ . सुरेश पाटील यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले संघटनेच्या आंदोलनामुळे चोपडा तालुक्यातील गोरगरिबांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल अश्या आपेक्षा बाळगून ज्या कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वी केले त्यांचे मनापासुन संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांनी कौतुक केले दिरंगाई करणाऱ्या डॉक्टराच्या कार्यमुक्तीचे पत्र डॉ . सुरेश पाटील यांच्या कडून स्वीकारतांना अनिताताई बाविस्कर , बबिता बाविस्कर , अनिताताई वार्डे , कल्पनाताई अहिरे , निता पाटील , विकास सोनवणे , प्रविण करनकाळ , रतन शिरसाठ , दिपक बाविस्कर उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा