उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथिल दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास जळगांव जिल्हा सामान्य रुग्णालया समोर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा निळे निशाण सामाजिक संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.
दि . ०१ जुलै २०२४ रोजी चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे डॉक्टरांच्या दिरंगाई मुळे एक शेत मजुराचा मृत्यु झाला तसेच काही दिवसापूर्वी एक गर्भवती महिलेच्या सिजर करण्याच्या नावाने जिवीताशी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला इतकेच नाही तर शवविच्छेदन गृहात मयताच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांच्या खाजगी पैश्यांची मागणी केली जाते तर पैसे मागणारे व्यक्ती रुग्णालयातील कर्मचारी नसुन बाहेरचे व्यक्ती आहे अशि माहिती चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैदकिय अधिक्षक डॉ . सुरेश पाटील यांनी दिलेली आहे तरी त्या डॉक्टरा विरुद्ध कारवाई केली जात नसेल तर आपण त्यांना पाठीशी घालत आहे असे आम्हाला वाटते
चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथिल त्या डॉक्टांवर कारवाई करण्यात यावी यासाठी संघटनेच्या वतीने ०९ जुलै २०२४ रोजी आंदोलन करण्यात आले परंतु डॉ . सुरेश पाटील यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले तरी आज पावेतो कुठलीही कारवाई करण्यात आलेली त्या अनुषंगाने दि . १५ जुलै २०२४ पासुन चोपडा उपजिल्हा रुग्णालय संमोर संघटनेचे / अध्यक्ष यांच्या उपस्थीतित संघटनेच्या महिला ठिय्या आंदोलन करित आहे तरी आपण या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन त्या डॉक्टरांवर कारवाई न केल्यास आपण त्यांना पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ १७ जुलै २०२४ पासुन जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव समोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन महिला आघाडिच्या वतिने केले जाईल तसेच आंदोलना दरम्यान काही एक अनुचित प्रकार घडला त्याला सर्वस्वी आपण जबाबदार आहे कृपया याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा