उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे डॉक्टरांच्या बेजबाबदार व हलगर्जीपणा मुळे झालेल्या मृत्युची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी.अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल निळे निशाण सामाजिक संघटनेची मागणी
दि. ०१ जुलै २०२४ रोजी चोपडा शहरातिल पुंडलीक महाजन यांना सर्पदंश झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्या ठिकाणी वेळेवर डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे पुंडलीक महाजन यांची प्रकृती खालावली तेव्हा उपस्थित असलेल्या नर्स यांनी पुंडलीक महाजन यांचेवर तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार करून आपले कर्तव्य बजावले परंतु रुग्णालयातिल डॉक्टरांनी जाणिव पुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे पुंडलीक महाजन यांची प्रकृती खराब झाली व त्यांचा मृत्युशी झुंज देत असतांना दुर्देवी मृत्यू झाला.
पुंडलीक महाजन यांच्या मृत्युस रुग्णालयातिल संबंधित डॉक्टर जबाबदार असुन आम्ही रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . सुरेश पाटील यांना जाब विचारला असता त्यांनी आम्हाला उडवाउडविचे उत्तर देऊन पुंडलिक महाजन यांच्या मृत्युस जबाबदार असलेल्या बेजबाबदार डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला .
महाशय ,
पुंडलिक महाजन हे शेतमजुर असुन संपूर्ण कुटुंबाच्या पाळण पोषणाची जबाबदारी त्यांचेवर होती परंतु त्या बेजबाबदार डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे पुंडलिक महाजन यांच्या कुटूबांवर दुखःचा डोंगर कोसळला असुन त्यांचे कुटुंब आज पुर्णपणे निराधार झालेले आहे तरी महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन पुंडलिक महाजन यांच्या मृत्युस कारणीभुत डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून त्यांना कायमस्वरूपी सेवा मुक्त करण्यात यावे हि असे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले
आरोग्य विभागातील अनेक व्यक्ती दोषी व्यक्तींना पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात असुन आपण या प्रकरणात वैयक्तीक लक्ष देऊन संबंधीत दोषी व्यक्तींवर कारवाई करावी .
अन्यथा दि .०९ जुलै २०२४ पासुन जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव तसेच उपजिल्हा रुग्णालय चोपडा व तहसिलदार कार्यालय चोपडा येथे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन चोपडा तहसील येथे देण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा