अन्न, औषध प्रशासनाची धडक कारवाई

अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव पथकाने बुधवारी
मुक्ताईनगर बोदवड रोड, बोदवड शहराजवळ सापळा
रचलेला होता. त्यासुमारास संशयित वाहन क्र. एम. एच.
१९ ७८८८ या वाहनाला प्रतिबंधीत अन्न पदार्थाची चोरटी
वाहतूक होत असल्याच्या संशयावरुन् थांबविले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार व त्यांचे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी. के. एच. बाविस्कर, आ. भा. पवार यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यलियाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे व मा. सह आयुक्त, (नाशिक विभाग) सं. भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

0/Post a Comment/Comments