दोन गटांमध्ये हाणामारी आंतरजातीय विवाहाच्या वादातून शहरात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना
घडली असून या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या संदर्भातील माहिती अ्शी की, शहरातील एका तरूणाने २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुस्या एका समाजातील तरूणीशी विवाह केला. यामुळे त्या तरूणाला मुलीच्या माहेरच्या मंडळीकड्ून नेहमीच धमकावण्यात येत होते. यातच आज सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास या तरूणाला बस स्थानकाच्या समर मुलीच्या आप्तांनी त्याला बेदम मारहाण केली. यात बंदूक ताणून त्याला धमकावतांना फायटरने मारून चाकूने वार करण्यात आले. यात तरूण जखमी झाला. दरम्यान, भर रसत्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेताच हल्लेखोरांनी पळ काढला. या प्रकरणी सदर तरूणाने दिलेल्या पफिर्यादीवरून मुलीच्या माहेरच्या १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात मुलीच्या माहेरच्या मंडळीच्या वर्तीने मुलीच्या वडलांच्या मित्राने दुसरी फिर्याद दाखल केली आहे. यात याच प्रकरणात विवाह केलेला तरूण हा मुलीच्या माहेरच्या लोकांना सातत्याने धमकावत होता असे नमूद केले आहे.
आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास या तरूणाने अपमानास्पद बोलून आपल्या सहका्यांच्या मदतीने माहेरच्या मंडळीवर हल्ला करून जखमीकेल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सदर तरूण आणि त्याच्या सोबतच्या एकूण ११ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अशा प्रकारे या हाणामारीत परस्पर विरोरधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून एकूण २९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात
आला आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त राखण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा