हंबर्डी ता.यावल जि.जळगाव
यावल तालुक्यातील हंबर्डी येथे वार्ड क्र.१मधील नागरिकांच्या रस्त्याच्या समस्या सुटेना
हंबर्डी येथे वार्ड क्र.१मधील नागरिकांच्या घरासमोर तीन रस्ते आहे.ते रस्ते काँक्रीटीकरण करण्यात यावे या करिता. वार्ड क्र.१मधील नागरिक हे ग्रामपंचायत कार्यालय हंबर्डी येथे जाऊन नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या की आमच्या घरासमोरील जे रस्ते आहे ते आज पर्यंत करण्यात आले नाही.
आम्हाला पावसाळ्यात मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो आम्हाला त्या रस्त्याने पावसाळ्यात चिखल असल्याने चालतांना मोठा त्रास होतो.तरी आम्हाला जे रस्ते आज पर्यंत झालेच नाही ते करून आमच्या समस्येचे निराकरण करावे.जो रस्ता पहिले करण्यात आला होता तोच रस्ता परत करण्यात येत आहे.
असे नागरिकांनी त्या वेळी सांगितले मात्र ग्रामपंचायत कार्यालय येथून नागरिकांना सांगण्यात आले की हा रस्ता खासदार निधी मधून करण्यात येत आहे या मध्ये ग्रामपंचायत चा काही एक संबंध नाही.
नागरिकांना एक प्रश्न पडला की झालेला रस्ता परत करण्यात येतो परंतु न झालेले रस्ते का करण्यात येत नाही.या कडे खासदार यांनी लक्ष देऊन आमच्या समस्येचे निराकरण करावे असे नागरिकांनी त्या वेळी म्हटले आहे
टिप्पणी पोस्ट करा