रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मजुर वर्ग असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात परंतु अनेक संदर्भात त्यांना आपला हक्कापासून वंचित ठेवले जाऊन त्यांच्या जिविताशी खेळण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात रावेर तालुक्यात होत आहे .
१ ) रावेर तालुक्यातिल शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलांचे मोठ्याप्रमाणावर हेळसांड करून रक्त कमी असल्याच्या नावाखाली संबंधीत नर्स वेळ काढूपणा करून जबाबदारी झटकून तसेच वेळेवर डॉक्टर उपस्थित न राहुन त्या महिलेच्या जिविताशी खेळण्याचा प्रयत्न करित आहे .
२ ) रावेर ग्रामिण रुग्णालयाचे तत्कालिन वैदकिय अधिक्षक डॉ . एन . डी . महाजन यांच्या कार्यकाळातिल कार्यभाराच्या चौकशी कामी तात्काळ त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात यावी तसेच गर्भवति महिलाच्या सोनोग्राफी व प्रसुतीच्या वेळी सिझर करण्याची अवश्यकता भासल्यास स्थानिक पातळीवर व्यवस्था करण्यात यावी .
३) रावेर तहसिलदार यांनि रावेर ग्रामिण रुग्णालयातील आरोग्य विषय सुख सुविधा करिता उपलब्ध करून दिलेल्या निधितून शस्त्रक्रिया गृह शुरू करण्यात यावे .
४) अन्न सुरक्षा यादीतून रावेर तालुक्यातिल अनेक अपात्र व्यक्तींची नावे कमी करून पात्र गोरगरिब गरजु लाभार्थी व्यक्तींना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात यावे .
४ ) रावेर तालुक्यातील ऐणपुर , निंभोरा , उदळी , गाते या गावांमध्ये विषारी द्रव्य युक्त हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी तसेच शासनाची दिशाभुल करून विषारी द्रव्य भेसळ करून ताडी विक्री करणाऱ्या सरकार मान्य ताडी विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.
असे निवेदन रावेर तालुक्यातील निळे निशाण सामाजिक संघटनेच्या महिला सामाजिक कार्यकर्ता यांनी रावेर तहसीलदार यांना दिले.
त्याप्रसंगी संघटनेचे सदाशिव निकम , विजय धनगर , ज्योत्सना संन्यास , अल्का जाधव , सुनंदा रायमळे , चंबाबाई अवसरमल , रेखा तायडे , सयाबाई इंगळे , कुंदन तायडे तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा