रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीतील ऐनपुर निंभोरा व सावदा पोलिस स्टेशन हद्दीतील उदळी व गाते गांवामध्ये अनेक तरुण विषारी द्रव्यापासुन तयार करण्यात आलेल्या हातभट्टी दारू व रसायनयुक्त ताडी यामुळे मृत्यु मुखी पडले व ४ ते ५ तरुण मृत्युशी झुंज देत आहे यासंदर्भात आम्ही निंभोरा पोलीसात तक्रार केली परंतु काही एक फायदा झाला नाही दारूविक्री करणाऱ्या व्यक्तीकडून संबंधित बिटचे कर्मचारी पैसे घेतात त्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही .
ज्या मुलांना आम्ही जन्म दिला त्या मुलांना मरतांना आम्ही बघत आहोत तरी ऐनपुर तसेच निंभोरा व उदळी तसेच गाते गांवात खुलेआम हातभट्टी दारूच्या व रसायनयुक्त ताडी नावाने विष विकणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा आपणा कडून आम्हाला खुप आपेक्षा आहे तरी आपण आम्हाला न्याय द्यावा . असे निवेदन सामाजिक कार्यकर्ता महीला यांनी.अप्पर पोलीस अधीक्षक सो.फैजपुर विभाग फैजपुर ता.यावल जि.जळगांव येथे दिले.
रावेर / यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मजुर वर्ग असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात परंतु अनेक संदर्भात त्यांना आपला हक्कापासून वंचित ठेवले जाऊन त्यांच्या जिविताशी खेळण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात रावेर / यावल तालुक्यात होत आहे .
या दोघ १ ) तालुक्यातिल शासकीय रुग्णालयात प्रसुती काळात मोठ्याप्रमाणावर हेळसांड करून रक्त कमी असल्याच्या नावाखाली संबंधीत नर्स वेळ काढूपणा करून जबाबदारी झटकून तसेच वेळेवर डॉक्टर उपस्थित न राहुन त्या महिलेच्या जिविताशी खेळण्याचा प्रयत्न करित आहे .
२ ) या दोघ तालुक्यातिल अनेक गोरगरिब गरजु व्यक्तींना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात यावे .
३ ) दोघ तालुक्यात विषारी द्रव्य युक्त हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी तसेच शासनाची दिशाभुल करून विषारी द्रव्य भेसळ करून ताडी विक्री करणाऱ्या सरकार मान्य ताडी विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी जेणे करून अनेकांचे प्राण वाचतिल .
वरिल सर्व विषय जनहिताचे व अवश्यक असुन आपण तात्काळ निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा असे निवेदन महिला सामाजिक कार्यकर्ता यांनी म.अप्पर जिल्हाधिकारी सो.फैजपुर विभाग ता .यावल जि. जळगांव यांना दिले.त्या प्रसंगी महिला उपस्थित होत्या
टिप्पणी पोस्ट करा