यावल ; फैजपूर रोडवर कला वाणिज्य व
विज्ञान महाविद्यालयाच्या मागील बाजूस व्यासनगर मधील कांतोडी नाल्यावरील पूल, व डांबरीकरण रस्ता बेकायदा तोडफोड करून पाणीपुरव्याची पाईपलाईन तोडून, तसेच सार्वजनिक रस्त्यावर अवैथ गौण खनिज सांठा करून बेकायदा काम सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीक्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेकायदा अवैध गौण खनिज साठा सार्वजनिक रस्त्यावर पडलेला असताना मात्र यावल मंडळ अधिकारी आणि तलाठी कारवाई करीत नसल्याने तक्रारदार भूषण नगरी यांनी बोलताना सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की व्यासनगर मध्ये
नगरपरिषदेने नुकताच डॉंबरीकरणाचा रस्ता केला होता
आणि आहे हा सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता एका
ठिकाणी बालाजी आणि नवकार सिटी विकासकाने,
ठेकेदाराच्या माध्यमातून आणि यावल नगरपरिषदेची
कोणतीही परवानगी न घेता खोदून,त्या ठिकाणी
सार्वजनिक वापराची पाण्याची पाईपलाईन सुद्धा
तोडून,तसेच कांतोडी नाल्यावरील पुलाची तोडफोड केली
आणि बेकायदा गौण खनिजाचा साठा त्या ठिकाणी
सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर आणून टाकला आहे
याबाबत भूषण नगरे यांनी यावल नगरपरिषद यावल
तहसीलदार यांच्याकडे रीतसर तोंडी तक्रार केल्यावर सुद्धा प्रत्यक्ष जागेवर मंडळ अधिकारी किंवा तलाठी नगरपरिषद अधिकारी तात्काळ हजर झाले नाहीत त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावल नगरपालिका आणि महसूल कार्यक्षेत्रात अशा प्रकारे बेकायदा बांधकाम सुरू करून अवैध आणि निकृष्ट प्रतीचा गौण खनिज साठा सार्वजनिक रस्त्यावर आणून ठेवल्याने आणि याबाबत तक्रार केल्याने यावल महसूल आणि यावल नगरपरिषद काय कार्यवाही करणार याकडे आता संपूर्ण व्यासनगर मधील रहिवासी नागरिकांचे तथा भूषण नगरे लक्ष वेधून आहे.याबाबत कार्यवाही न झाल्यास लोकशाही शांततेच्या मार्गाने संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सुद्धा भूषण नगरे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा