मुक्ताईनगर ;६ हजारांची लाच घेताना ग्रामसेवकासह शिपाईला अटक

६ हजारांची लाच घेताना ग्रामसेवकासह शिपाईला अटक

 फेरफार नाव लावण्यासाठी तडजोडीओंती सहा हजारांची लाच स्वीकारताना मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामसेवक मनोज सुर्यकांत घोडके (३४) व शिपाई सचिन अशोक भोलाणकर (२३) यांना बुधवारी सायंकाळी जळगाव एसीबीने अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, राजुरा गावातील ४२ वर्षीय तक्रारदार यांच्या आईच्या नावाचे घर व प्लॉट असून त्योना घर व प्लॉटवर आईचे नाव कर्मी करून तक्रारदार यांचे फेिरफार नाव लावण्यासाठी तक्रारदाराने राजुरा ग्रामपंचायतीत अर्ज केला. तक्रारदार यांचे फेरफारवर नाव लावण्यासाठी ग्रामसेवकाने ११
हजारांची लाच १५ मे रोजी मागितली होती व त्याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. बुधवारी लाच पडताळणीत ११ हजारांची लाच मागणी केल्यानंतर ग्रामसेवकाने तडजोड़ करीत सहा हजारांची लाच शिपायाकड़े देण्याचे सांगितले. शिपायाने लाच
स्वीकारताच ग्रामसेवकालाही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान,संश्यीतांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला

0/Post a Comment/Comments