आज दि . ११ एप्रिल २०२४ रोजी ग्रामिण रुग्णालय रावेर ता. रावेर जि . जळगाव येथे निळे निशाण आरोग्य समिति रावेर तालुका यांच्या वतिने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सर्व प्रथम ज्योतिबा फुले व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन म . डॉ . विशाल जैस्वाल पोलिस निरिक्षक रावेर . डॉ . कळसकर वैदकीय अधिकारी ग्रामिण रुग्णालय रावेर व डॉ . संदीप पाटील . यांच्या हस्ते करून जयंति साजरी करण्यात आली व नंतर रक्तदान शिबीर शुरू करण्यात आले शिबीरा मध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच ज्यांनी आपला अमुल्य वेळ रक्तदान शिबिरास दिला ते पोलिस निरिक्षक जैस्वाल साहेब तसेच ज्यांच्या प्रयत्नामुळे शिबीर संपन्न झाले ते डॉ . कळसकर व डॉ . संदीप पाटील व ज्यांनी रक्तदान केले त्यांचे आभार संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी मानले त्या प्रसंगी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम , ता . अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे व ता . उपाध्यक्ष बाळु निकम , आकाश निकम , रवि छपरीबंद यांनी परिश्रम घेतले तसेच शिबीराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून शिबीर यशस्वीते करिता निळे निशाण आरोग्य समितिचे तालुका अध्यक्ष गोकुळ करवले यांनी जबाबदारी पार पाडली त्या प्रसंगी सुधिर सैंगमिरे विभागीय अध्यक्ष , महिला ता . अध्यक्ष नम्रता हिवरे , ता . उपाध्यक्ष उज्वला वाघ , ज्योत्सना सन्यास , अल्काबाई जाधव , चंबाबाई अवसरमल , रेखा तायडे , युवक ता . अध्यक्ष राकेश तायडे , ता . उपाध्यक्ष नारायण सवर्णे , नंदाताई बाविस्कर , सागर बाविस्कर , विजय धनगर , विकास अटकळे हे उपस्थित होते .
निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने म.फुले जयंती व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न
निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने म.फुले जयंती व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न
टिप्पणी पोस्ट करा