प्रथमच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीत महिलेला प्राधान्य चोपडा - ज्या समाजात स्त्रीया पुढे, तो समाज पुढे,ज्या देशात स्त्रीयांची प्रगती
होते तोच देश प्रगतीशील असू शकतो विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हे ऐतिहासिक बोल आजही खरे ठरत आहेत. नुकताच ८ मार्च जागतिक
महिला दिवस सर्वत्र साजरा करण्यात येत असतांनाच महिला दिनाच्या औचित्य साधून चोपडा तालुक्यातील पंचशिल नगर येथील समाज बांधवांच्या माध्यमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनिताताई बाविस्कर यांची महिलेची निवड करून महिलेला प्राधान्य देण्यात आले.
नुकत्याच चोपड़ा तालुक्यातील पंचशिल नगर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव
समिती गठन सभा आयोजित करण्यात आली होती. यात पहिल्यांदाच महिलेला प्राधान्य देण्यात आले असून समितीचे अध्यक्षपदी अनिताताई बाविस्कर तर
उपाध्यक्षपदी वसंत शिंदे यांची निवड करण्यात आली. तसेच खजिनदार पदी प्रविण करनकाळे, सेक्रेटरीपदी विलास भालेराव सचिवपदी रोहिदास भालेराव, सचिवपदी विकास सुभाष सोनवणे, सदस्यपदी सुनील भालेराव, श्रीकांत भालेराव, अविनाश बाविस्कर, चंद्रकांत बागुल, अक्षय शिरोडकर, तर प्रमुख सल्लागार पदी राजेंद्र बाविस्कर, व सल्लागार परदी निलेश भालेराव याची निवड करण्यात आली. यावेळी पंचशील नगर येथील मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा