दि .२१/०३/२०२४ गुरुवार रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेची रावेर तालुका महिला कार्यकारणी गठीत

निळे निशाण सामाजिक संघटनेची रावेर तालुका महिला कार्यकारणी गठीत
     दि .२१/०३/२०२४ गुरुवार रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या रावेर येथिल मुख्य कार्यालयात संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थितीत जळगांव जिल्हा प्रमुख चारुलता सोनवणे यांच्या आदेशानुसार महिलांची बैठक आयोजित करण्यात आली त्या बैठकीमध्ये संघटनेच्या कार्य कतृत्वावर विश्वास ठेऊन तालुक्यातील भाटखेडा , निंभोरा , पुनखेडा , वाघोदा , ऐनपुर , धामोडी व इतर अनेक गांवातिल उच्चशिक्षित महिलांनी बैठकित सहभाग नोंदविला त्याबद्दल संघटनेच्या वतिने महिलांचे कौतुक करण्यात आले महिलांनी No Politics only Social च्या घोषणा देऊन समाज परिवर्तानाच्या दिशेने वाटचाल केल्यामुळे आनंदभाऊ बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची जंबो कार्यकारणी गठीत करण्यात आली व संकल्प करण्यात आला कि गांव पातळीवर जिथे निळे निशाण संघटनेची कार्यकारणी आहे त्या गांवामध्ये महिला शाखा अध्यक्षांनी बौद्ध विहारात त्रीशरण पंचशिल ग्रहण करुण बौद्ध समाजातील बालकांना बौद्ध धम्माचे संस्कार द्यावे अश्या सुचना महिला शाखा अध्यक्षांना देण्यात आल्या . 
॥ समाजा करिता कधीही कुठेही ॥

0/Post a Comment/Comments