अवैध वाळु वाहतुकीचा मिनी ट्रक पकडला

तालुक्यातील किनगाव ते डांभुर्णी दरम्यान फैजपुर विभागीय सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह व त्यांच्या पथकाला गस्तीवर असताना मध्यरात्री अवैध गौण खनीज वाहतूक करताना टाटा कंपनीचा ट्रक आढळल्याने ट्रक जप्त करत वाहन चालकासह तिघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. सुमित बाविस्कर यांच्या फियादीवरून गुन्हा दाखल करीत ट्रक जप्त करीत
गुन्हा दाखल आला. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र बागुले हे करीत आहेत

0/Post a Comment/Comments