जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाच्या वाळू माफियांवर महसूल यंत्रणा कारवाई करत असली तरी वाळू माफियांचे धाडस कमी होताना दिसत नाही.
त्यातच कारवाई करणाच्या अधिकार्यांवर हल्ले केले जात आहे. अशातच आता वाळू माफियांनी जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार यांच्या पथकावर सात ते आठ वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेत लोखंडी रॉडने वार केल्याने उपजिल्हाधिकारी कासार यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा