महिलांना अपमानित भाषेचा वापर करणाऱ्या बस वाहकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी महिलांनी रावेर बस डेपो मध्ये केली तक्रार
रावेर तालुक्यातील चीनावल येथील विद्यार्थिनी व महिलांनी रावेर बसस्थानकात बस वाहक यांच्या विरुद्ध तक्रार विजय पाटील यांच्याकडे केली.
तक्रार करतांना अर्जात महिलांनी विद्यार्थिनी ने सांगितले की आम्ही रोज फैजपूर ते चीनावल ये जा करीत असतात. तसेच बस रोज ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी थांबवण्यास सांगितले असता आमच्या शी बस वाहकाने अरे रावी ची भाषा वापरून दहा रुपया मध्ये घरी सोडून येऊ का जास्त शहाणपणा शिकवता का मला व तसेच महिला कडून दरवाजा उघडला गेला नाही तर महिलांनी व विद्यार्थिनी ने त्यांना दरवाजा उघडण्यास सांगितले असता बस वाहकाने सांगितले आमचं ते काम नाही तुमचा हाताने उघडा तसेच एका महिलेला ती रोज बस ने एकटी ये जा करीत असते त्या महिलेला बस वाहकाने फैजपूर ते चिनावल चे भाडे तीस रुपये घेतले व त्या तिकिट मध्ये एक महिला व पुरुष असे लिहिले महिलेने विचारणा केली असता तीस रू कसे तर त्या महिलेशी अरे रावी ची भाषा सुरुवात केली.
तसेच विद्यार्थिनी व महिलांशी अपमानित भाषेचा वापर केला.
तरी बस वाहकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे महिला व विद्यार्थिनी प्रवाशांन कडून होत आहे.
कारवाई न झाल्यास महिला व विद्यार्थिनी च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे महिलांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा