ग्रामिण रुग्णालय रावेर येथिल डॉक्टरांच्या बेजबाबदार पणा व निर्दयी धोरणाच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन २६/०२/२०२४ रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले असून दोन दिवस उलटून ही कुठली ही मागणी मान्य न झाल्यामुळे आज दिनांक २८/०२/२०२४ रोजी आमरण उपोषणाला निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष आनंदभाऊ बावीस्कर यांच्या वतीने सुरुवात करण्यात आली.
मागण्या मान्य न झाल्यास उद्या दिनांक.२९/०२/२०२४ रोजी महिला आघाडी च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रावेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बावीस्कर व महिल आघाडी च्या वतीने अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून सांगितले आहे.
१ )गर्भवति महिला व नवजात शिशु यांची भविष्यात होणारी जिवित हाणि टाळण्यात यावी या करिता .
२ ) अपघात झालेल्या व्यवतीस जिवनदान मिळेल या करिता ग्रामिण रुग्णालयात रक्त पेढी तात्काळ शुरू करण्यात यावी .
३ ) दि . १७ / २ / २०२४ रोजि अपघात झालेल्या तरुणाचा मृत्यु रोवर ग्रामिण रुग्णालयाचे डॉक्टर व वाहन ( ॲम्बुलंस ) चालक उपस्थित नसल्यामुळे झालेला आहे याची उच्चस्तरीय विभागीय स्तराची त्री सदस्य चौकशी समिति मार्फत चौकशि करण्यात यावी अशी मागणी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा