ग्रामीण रुग्णालयाचे वैदकिय अधिकारी यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ उद्या होणाऱ्या ठिय्या आंदोलनच्या महिला आघाडी निळे निशाण सामाजिक संघटनेची २५/०२/२०२४ रोजी बैठक संपन्न
दि .२५/०२/२०२४ रविवार रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या मुख्य कार्यालय येथे रावेर ता . रावेर जि . जळगांव येथिल ग्रामीण रुग्णालयाचे वैदकिय अधिकारी यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक / अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जळगांव जिल्हा प्रमुख चारुलता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली रावेर तालुका महिला आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती दि. २६/०२/२०२४ सोमवार रोजी ग्रामीण रुग्णालय रावेर यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ रावेर तहसीलदार कार्यालय समोर निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने सकाळी १० वाजेपासून ठिय्या आंदोलन सुरू होणार आहे तसेच जोपर्यंत शासन प्रशासनाकडून योग्य निर्णय लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील या संदर्भात संघटनेच्या जिल्हाप्रमुख चारुलता सोनवणे यांनी रावेर तालुका महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आंदोलनाची पूर्वतयारी करण्याच्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना देऊन सर्वसामान्य जनतेच्या जिवाचा खेळ मांडणाऱ्या रावेर ग्रामिण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याकरिता तालुक्यातील गोरगरीब जनतेने या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले त्याप्रसंगी निळे निशाण सामाजिक संघटना उपाध्यक्ष नंदाताई भावटे ,नंदाताई बाविस्कर , सरचिटणीस वैशाली हेरोळे , उपाध्यक्ष सदाशिव निकम , विभागीय अध्यक्ष सुधीर सैंगमिरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते बैठकीच्या यशस्वीते करता रावेर शहराध्यक्ष संकेत तायडे यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा