रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे व रावेर यावल विधानसभा आमदार शिरीष चौधरी यांचे निळे निशाण सामाजिक संघटना च्या महिला आघाडी वतीने जाहीर निषेध.

रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे व रावेर यावल विधानसभा आमदार शिरीष चौधरी यांचे निळे निशाण सामाजिक संघटना च्या महिला आघाडी वतीने जाहीर निषेध.
आज रावेर शहरात खासदार यांचे शासकीय कार्यक्रम असतांना रावेर तहसीलदार कार्यालय समोर निळे निशाण सामाजिक संघटना च्या वतीने खालीलप्रमाणे मुद्द्यांवर ठिय्या आंदोलन चालू असतांना देखील खासदार रक्षा खडसे यांनी सदर आंदोलन स्थळी भेट दिली नाही तसेच, रावेर यावल मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांचे सुद्धा आपल्या तालुक्यात लक्ष नसल्याने व जनता वाऱ्यावर असल्याने निळे निशाण महिला आघाडी च्या वतीने जाहीर निषेध...

ग्रामिण रुग्णालय रावेर येथिल डॉक्टरांच्या बेजबाबदार पणा व निर्दयी धोरणाच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन - निळे निशाण सामाजिक संघटना

    विषय खालील प्रमाणे 
१ ) अवश्यकता भासल्यास सिझर करण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी. 
२) कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया तात्काळ कार्यान्वीत करण्यात यावी.
३ ) नवजात शिशू अतिदक्षता विभाग तात्काळ कार्यान्वीत करण्यात यावे .
४ ) रक्त पेढी कार्यान्वीत करण्यात यावी. 
५ ) वैदकिय अधिकारी व अधिक्षक यांना स्थानिक पातळीवर राहण्यास सक्ती चे आदेश देण्यात यावे. 
६ ) रुग्णाकरिता रुग्नवाहिका तसेच शवविच्छेदन झाल्यानंतर शववाहिका यांची तात्काळ कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी.
७) दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी रेल्वे स्टेशनं रोड रावेर या ठिकाणी एक अपघात झाला होता त्यात एका तरुणाचा जीव गेला होता.. त्या संदर्भात सुद्धा रावेर ग्रामीण रुग्णालयाची चौकशी आरोग्य विभाग जळगाव यांच्याकडून झाली पाहिजे...
या मागण्या करिता व गोर गरिबांच्या हक्काच्या मागणी करीता रावेर तहसिलदार कार्यालया समोर ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली आहे जोपर्यंत गोरगरिबांच्या न्याय हक्काचे प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहिल या करिता आंदोलनाला आपले पाठबळ गरजेचे आहे तरी या आंदोलनात सहभागी व्हावे.

0/Post a Comment/Comments