याप्रकरणी विविध कलमान्वये ४० ते ५० जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन समुदायात जातीय तेढ निर्माण होवून दगडफेक करण्यात आली होती. या अनुषंगाने पोलीस पथक हे दहिगावात आल्यानंतर बसस्थानक चौकात जमावाने एकत्र येत पोलीस प्रशासनाविरुद्ध ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरिता फैजपूर विभागाच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्यासह पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरीकांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान उपअधिक्षक अन्नपुर्णा सिंह हे पुढील गुन्हा दाखल करण्याकामी दहिगाव येथून जात असतांना त्या ठिकाणी जमलेल्या ४० ते ५o जणांनी उपाधिक्षकांच्या शासकीय गाडीला अडवत घेराव घालता. दरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस काँस्टेबल सुशील घुगे यांना व बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांना धक्काबुक्की करीत जमावाने शासकीय कामात अडथळा निर्माण करत पसार झाले. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुशील रामदास घुगे यांनी पोलीसात फिर्याद दिल्याने दहिगाव गावातील ४०ते ५० अज्ञात लोकांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा