हातभट्टी दारू व अवैध दारू बंदी करीता निळे निशाण सामाजिक संघटनेच्या रावेर येथिल तरुणांचा एल्गार २० जानेवारी पर्यंत हातभट्टी , ताडी व अवैध दारू विक्री बंद न झाल्यास संघटनेच्या वतीने २२जानेवारी रोजी उत्पादन शुल्क विभाग भुसावळ विभागीय कार्यालयावर निघणार मोर्चा

हातभट्टी दारू व अवैध दारू बंदी करीता निळे निशाण सामाजिक संघटनेच्या रावेर येथिल तरुणांचा एल्गार
       रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विषारी द्रव्य युक्त हातभट्टीची दारू तसेच रसायन युक्त ताडी यांची सर्रासपणे चौका चौकात विक्री होत असून शेकडो तरुण मृत्यूमुखी पडलेले आहेत व अनेक तरुण मृत्यूमुखी पडण्याच्या तयारीत आहेत असे असताना उत्पादन शुल्क चे अधिकारी व कर्मचारी मात्र अर्थपुर्ण व्यवहारामुळे बघायची भुमिका घेत आहे तरी एकीकडे तरुणांचे आयुष्य उध्दवस्त होत आहे अनेक महिलांचे संसाराची राखरांगोळी झाली व अनेक लहान मुले अनाथ झाली तरीही दारू बंदी विभागाला काही एक देणे घेणे नाही त्यामुळे तरुण पिढी व महिलांचे संसार कसे वाचतील या करिता संघटनेच्या वतीने सर्वपरी प्रयत्न करण्याच्या सुचना संघटनेच्या जळगांव जिल्हा प्रमुख चारुलता सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या तसेच २० जानेवारी २०२४ पर्यंत हातभट्टी , ताडी व अवैध दारू विक्री बंद न झाल्यास संघटनेच्या वतीने २२ जानेवारी २०२४ रोजि उत्पादन शुल्क विभाग भुसावळ विभागीय कार्यालयावर . असंख्य महिलांचा मोर्चा काढण्यात येणार आहे तसेच तालुक्यातील रावेर शहर मोरगांव तामसवाडी अहिरवाडी अटवाडे अजनाड निरूळ पाडले धुरखेडा दोधा नेहता कुसुंबा थेरोळा बोहर्डे भोकरी रसलपुर भोर अजंदे या गांवातिल दारू विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा २६ जानेवारी २०२४ रोजी रावेर तहसिलदार / पोलिस स्टेशन समोर आंदोलन करण्यात येईल असे निवेदण देण्यात आले . 
      त्याप्रसंगी संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष सदाशिव निकम , फैजपुर विभाग अध्यक्ष सुधिर सेंगमिरे , रावेर तालुका नियोजन समिती अध्यक्ष विजय धनगर , रावेर शहर अध्यक्ष संकीत तायडे , रावेर शहर स . का . अध्यक्ष अजय मेढे , अनिल धनगर , विकास अटकाळे , चंद्रकांत सोनवणे , वासुदेव महाजन , रईस खान व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments