हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांना हद्दपार करा अन्यथा आंदोलनात्मक भुमिका घेणार - निळे निशाण सामाजिक संघटना
दि.०४ जानेवारी २०२४ गुरुवार रोजी रावेर जि . जळगाव येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने रावेर तहसीलदार यांचे सह सावदा . निंभोरा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले की १ . )रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विषारी द्रव्यापासुन तयार करण्यात आलेल्या हातभट्टी दारु व ताडी विक्री होत असुन त्यामुळे गेल्या वर्षात अनेक तरुणाया मृत्यु झाला तसेच अनेकांचे संसार उद्धवस्त झाले तर अनेक तरुण मृत्यु मुखी जाण्याच्या तयारीत आहेत परंतु उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अर्थपुर्ण व्यवहारामुळे या गंभिर विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे महाशय जिल्हाअधिकारी यांनि तात्काळ या गंभिर विषयांची दखल घेऊन ज्यांच्यामुळे गांवात शांतता भंग होत आहे ज दोन समाजात तेद निर्माण होत आहे महिलावर अत्याचार होत आहे अनेक महिलांना जिवघेण्या वेदना सहन कराव्या लागत आहे त्या हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तालुक्यातुन बाहेर काढण्यात यावे तसेच ताडी विक्री दुकानावर ताडी कुठून येते कशि तयार केली जाते याची चौकशि करून कारवाई करण्यात यावी . २ ) गोर गरीब गरजु अंध अपंग विधवा निराधार यांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात यावे . ३ ) तालुक्यातिल नामांकीत डॉक्टांरानी रात्री अपरात्री रुग्णाकडे दुर्लक्ष न करता वेळीच औषधोपचार करून त्या रुग्णाला जिवनदान मिळेल या करीता प्रयत्न करावे अश्या मागण्याचे निवेदन देण्यात आले . येत्या पंधरा दिवसात आमच्या प्रश्नाचे निराकारण न झाल्यास संघटना आंदोलनात्मक भुमिका घेणार असेही निवेदणात नमुद करण्यात आले .त्याप्रसंगी धनराज घेटे , सदाशिव निकम , सुधिर सैंगमिरे , विजय धनगर , संकित तायडे , नारायण सवर्णे , दिलिप सवर्णे , उदय वाघ , संतोष सवर्णे , रोहन तायडे , बाळु तायडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा