समस्त स्री वर्गास,सन्मानाचं जीवन जगण्यास ज्ञानाचा महामार्ग निर्माण करून, ज्ञानधारी स्त्री वर्ग जन्मास घालणाऱ्या, आद्य क्रांतिकारी, विकृत परंपरेच्या कर्दनकाळ, शिक्षणतज्ञ,समाजप्रबोधिका,सावित्रीमाई फुलें यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण दीप व धूप पूजा करून मोठ्या उत्साहात महिलांनी समाज मंदिर हंबर्डी येथे सावित्रीमाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. तसेच सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माविम स्वयम साहाय्य बचत गटाच्या वतीने रक्त तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
त्या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा