रावेर जळगाव जिल्ह्यात बौध्द समाजाच्याव्यक्तींवर अन्याय होत असल्याने त्या विरोधात रावेरयेथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीनेदि. २९/०१/ २०२४रोजी आंबेडकर चौकात रास्ता रोकोआंदोलन करण्यात आले.

रावेर जळगाव जिल्ह्यात बौध्द समाजाच्या
व्यक्तींवर अन्याय होत असल्याने त्या विरोधात रावेर
येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने
दि. २९/०१/ २०२४रोजी आंबेडकर चौकात रास्ता रोको
आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार बंडू
कापसे याना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात
आले.१)जातियव्देष भावनेने अत्याचार करणाच्या
गांवगुंडावर कठोर कारवाई व्हावी.२) बोदवड
तालुक्यातील चिचखेड सिम गांवामध्धये जातियव्देष।
भावनेतुन दि. ०४ जानेवारी २०२४ रोजी बौध्द युवक
रविंद्र इंगळे याचे अपहरण करून धारदार शस्त्राने जिवे
ठार मारण्याचा प्रयत्न करणाच्या गुंडांना पाठिशी
घालणाच्या पौलिस निरिक्षक गुंजाळ यांचेवर कारवाई
करून रविंद्र इंगळे याने दाखल केलेली फिर्याद माघार
घे नाही तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतिल
अशी धमकी देणाच्या पोलिस अधिकारी यांचे विरुध्ध
कठोर कारवाई करण्यात यावी तसेच जातियवादी
गांवरगुंडांना तात्काळ अटक करण्यात यावी. ३) रावेर
तालुक्यातिल निभोरा बु ॥ येथे वैयक्तीक कारणावरून काही गांवगुंडांनी दि. १४ जानेवारी २०२४ रोजी
बेकायदेशिर गांव बंद करून दहशत निर्माण केली तसेच
बेकायदेशिर जमाव जमवुन डॉ .बाबासाहेब आंबेडकर,
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेची तोडफो्ड
करून विटंबना केली व निभोंरा पोलिस स्टेशन समोर
बेकायदेशिर जमाव करून पोलिसांना घाण घाण
शिविगाळ करून शासकिय कामात अडथळा निर्माण
केला परंतु आज पावेतो ते ३० ते ३५ गांवगुंड मोकाट
फिरत आहे त्यांना तात्काळ अटक करून त्यांचे विरुध्द
कठोर कारवाई करण्यात यावी. ४) जामनेर
तालुक्यातिल मोयखेडा दिगर येथे बौध्द सरपंच
कल्पनाताई यांचे पति समाधान मेढे यांना विष देऊन
जिवे मारणाच्या व्यक्ती विरुध्द कठोर कारवाई
करण्यात यावी. ५) चोपडा तालुक्यातिल चौपडा
शहरात ७० वर्षा पासून वास्तव्यास असलेल्या बौध्द
समाजाचे ५० ते ७५ घर बेकायदेशिर रित्या नगर
पालिकेने काढण्याचे आदेश देऊन बौध्द समाजाच्या
लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न केलेला असुन नगर
पालिकेने बेकायदेशिर रित्या अवलंबलेले धोरण त्वरीत
थांबवावे . ६) रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे जातिय
द्वेष भावनेतुन पंचशिल ध्वज काढण्यात आले त्याची
तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशा
आशयाचे निवेदन देण्यात आले. रास्ता रोको प्रसंगी
शेकडो समाज बांधव - भगिनी उपस्थित होते.रास्ता
रोको आंदोलन यशस्वीतेसाठी धनराज घेटे,सावन
मेढे धुमाभाऊ तायडे, संकित तायडे ,रोहन तायडे राकेश
तायडे, कुंदन तायडे,करण घेटे, अरविंद भालेराव,गोपाल
अटकाळे गोकुळ करवले,नितिन गवई, अजय मेढे
भक्रंत्रेकांत कोळी, विजय धनगर सागर बाविस्कर,योगेश साळवे व बौद्ध समाजातील तरुणांनी
परिश्रम घेतले .

0/Post a Comment/Comments