७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, हंबर्डी ,ता. यावल येथे कृषी कन्या किमया नांद्रे,प्रियंका पाटील भाग्यश्री साबळे ,जानकी विसपुते ,यज्ञश्री महाजन .यांनी भव्य असा सहभागी ग्रामीण मूल्यांकन ( PRA) रांगोळी च्या मदतीने काढला. तसेच विविध कार्यक्रम राबवण्यात आले ,जसे की ध्वजारोहण, प्रभातफेरी, त्या प्रसंगी ग्रामपंचायत,ग्रामसेविका इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते, तसेच या कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त, बालविवाह प्रतिबंध शपथ घेण्यात आली. जि.प.प्राथमिक शाळेत कृषी कन्यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप केली.
हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय व शाळेमध्ये राबवण्यात आला व हा कार्यक्रम ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रम 2023 - 2024 या साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. मत्ते व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा