रावेर - यावल तालुक्यातील अवैध दारू विक्री विरोधात निळे निशाण सामाजिक महिला संघटनेचा जण आक्रोश मोर्चा

२३/०१/२०२४रोजी.भुसावळ दारुबंदी विभागाला निवेदन 
रावेर - यावल तालुक्यातील अवैध दारू विक्री विरोधात निळे निशाण सामाजिक महिला संघटनेचा जण आक्रोश मोर्चा

रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात हातभ‌ट्टी दारू तयार केली जात असुन देशी दारूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
 त्याच बरोबर रसायन युक्त ताडीची विक्री होते त्यामुळे अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे. महिलांचे संसार उद्धवस्त झालेले आहे.आणि अनेकांचे संसार उद्‌धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
तरी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बघायची भुमिका घेत असुन आपल्या कर्तव्यात कसूर करीत आहे तरी तालुक्यातील अवैध दारू बंद करावी तसेच खालील प्रमाणे नमुद असलेल्या गांवामध्ये हातभ‌ट्टी दारूच्या भट्टी व विक्री करणाऱ्यांवर येत्या ८ दिवसात कठोर कारवाई करावी अन्यथा निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन व अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

या गांवा मध्ये मिळते हातभट्टी _

हतनूर धरण,पुरी गोलवाडे,उदळी,गाते, तांदलवाडी,अजनाड,पाडले बु खु.,गंगापुरी, अटवाडे,निंभोरा,खिर्डी,धुरखेडा,दोधा,नेहता, खिरवड,अहिरवाडी,तामसवाडी,ऐनपुर, निंभोरासिम,रावेर,भोकरी या गांवामध्ये हातभ‌ट्टी दारू तयार होते आणि मोठ्या प्रमाणात विक्री होते तरी आपण तात्काळ कठोर कारवाई करावी,अशी मागणी भुसावळ तालुका उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सुजीत कपाटे यांचेकडे करण्यात आली आहे.

यावेळी चारुलला सोनवणे (जिल्हा प्रमुख वैशाली हेरोळे,नंदा भावटे,नंदा बाविस्कर,

अश्वीनी अटकळे, कविला शिंदे,अशोक तायडे, सदाशिव निकम,सुधिर सैगोले,विलास तायडे,

विजय धनगर,राकेश तायडे,नारायण सवर्णे, संकेत तायडे,संतोष सवर्ने, चंद्रकांत कोळी , महेंद्र बगाडे, राजेश रायमळे आदी तालुक्यातील व गावातील महिला व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments