काय आहेत मागण्या.
रेशन दुकादार वेळेवर रेशन देत नाही व दुकान वेळेवर उघडत नाही तसेच खरेदीदारांना
बिल पावती देण्यात येत नाही त्या गावांची नावे खालील प्रमाणे.
डांभूर्णी, किनगाव दहीगाव कोरपावली ,महेलखेडी, डों. कठोरा ,हिंगोणा , बामणोद ,पाडळसे, आमोदा, सांगवी बु., सांगवी खु्द.,भालोद चिखली खुर्द व बुद्रुक , हंबर्डी , मोहराळे, नायगाव ,विरावली ह्या गावांमध्ये रेशन वेळेवर मिळत नाही.
टेभीपूरण हे गाव भालशिव ग्रामपंचायत कार्यालयत समावेश करण्यात यावे, विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांचे कार्यालय पत्र दिनांक ३१/०३/१९९२ तारखेपासून ते आज पर्यंत गाव भालशिव मध्ये समावेश करण्यात आलेले नाही. ग्रामविकास अधिकारी व सरपंच जाणुन बुजुन करत नाही. गावकऱ्यांना शिक्षणापासुन व अन्य सुविधापासुन वंचित ठेवले जात आहे.
यावल तालुक्यातील घरकुल घोटाळा बाबत पंतप्रधान घरकुल योजने बाब खोटे उतारे दाखवुन घरकुल मंजुर करण्यात आले आहे तसेंच शबरी अंतर्गत व रमाई घरकूल योजना यांच्यावर एकाच उताऱ्यावर मंजुर करण्यात येत आहे.
यावल तालुक्यातील सांगवी धुळेपाडा या गावातील एक वर्षापासुन काहीच करण्यात आलेले नाही आता पर्यंत लोक पाण्यापासून वंचित आहे, त्याबाबत सुध्दा रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले होते तरी खोटी आश्वासन देण्यात आले होत.अशा अनेक समस्या चे अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा समस्या सोडवण्यात आल्या नाही.
म्हणून शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जो पर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत उपोषणास बसणार असल्याची माहिती निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष अशोक तायडे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा