संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना गावात जमा करता येणार हायातीचा दाखला

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना गावात जमा करता येणार हायातीचा दाखला 
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी हयातीचा
दाखला तहसील कार्यालयाऐवजी गावातील तलाठी कडे
जमा करावा.
अशा सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत.
हयातीचा दाखल सादर करण्यासाठी गोरगरीब लाभार्थी
दररोज ग्रामीण भागातून यावल येथे येतात. 
त्यांची ही अडचण आता दूर होणार आहे. दरवर्षी प्रशासनाकडून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याकडून हयातीचा दाखला घेतला जातो. हा दाखल सादर करण्याकरीता येथील तहसील कार्यालयात लाभार्थ्यांची  गर्दी होत असल्याने आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला तहसील कार्यालयाऐवजी गावातील तलाठी कडे
जमा करावा.अशा सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments