यावल; शेताच्या चारही बाजूंनी कुंपण लावलेल्या तारांमध्ये विद्युत प्रवाह असलेल्या तारांचा शॉक लागल्याने विशाल मेढे याचा जागीच मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे की विशाल रमेश मेढे रा.अडावद ता.चोपडा.येथील रहिवाशी असुन त्याचे शिक्षण १०पर्यंत झालेले आहे. तो अविवाहित असून हात मजुरी करीत होता.
दिनांक.२१/१२/२०२३ रोजी ३वाजता त्यांचे चुलत भाऊ अनिल मेढे यांच्या घरी जातो असे विशाल मेढे यांनी त्याची आई मालाबाई रमेश मेढे यांना सांगितले.
परंतु  विशाल हा त्याच्या चुलत भाऊ अनिल मेढे कडे आलाच नाही.विशाल चा चुलत भाऊ अनिल  चुंचाळे येथे घरी असताना.त्याला यावल पोलिसांनी फोनद्वारे विशाल बद्दल विचारणा केली असताना विशाल माझा सख्खा चुलत भाऊ आहे असे पोलिसांना सांगितले.

त्यांनी दिलेल्या माहिती वरून अनिल मेढे व त्याचे मामा सिध्दार्थ तायडे रा.यावल यांच्यासोबत सायंकाळी ५:००वाजेच्या सुमारास यावल येथे पंडित नगर लगत असलेल्या.प्रशांत मुरलीधर महाजन रा.यावल यांचे मालकीचे शेत गट क्रमांक.७२४/२जवळ गेलो त्या शेतात हरभरा पीक पेरलेले होते. व शेतात चारही बाजूने तीन तारांचे कुंपण लावून त्या मध्ये विद्युत प्रवाह सोडलेला होता.
त्या तारेच्या कुंपणात असलेल्या विद्युत तारेचा शॉक लागल्याने विशाल रमेश मेढे मयत स्तिथित पडलेला दिसून आला.
तसेच त्या ठिकाणी पोलीस व जमलेल्या लोकांनकडून अनिल मेढे यास समजले की, सदर चे शेत प्रंशात मुरलीधर महाजन रा.यावल  यांचे मालकीचे असून सदर चे शेत गेल्या ५वर्षापासून सचिन रमेश कोळी रा.यावल ता.यावल हे कसत आहे.
संपूर्ण शेताच्या चारही बाजूंनी सचिन रमेश कोळी याने तीन पदरी तारेचे कुंपण लावलेले असून  त्या सर्व कुंपणचे तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडलेला दिसून आला.
सदर शेताच्या कुंपण च्या तरांमध्ये विद्युत प्रवाह सोडल्यामुळे विशाल रमेश मेढे हा मयत अवस्थेत पडलेला होता त्याच्या छातीवर ,पोटावर,हातावर, तसेच दोन्ही पायाच्या गुडघ्यावर विद्युत तारेचा शॉक अनिल मेढे यास दिसून आला. 

शेताच्या कुंपण मध्ये लावलेल्या विद्युत तरेंच्या प्रवाह सोडल्यामुळे सदर तारांचा एखद्यास शॉक लागल्याने सदर इसमाचा मृत्यू होऊ शकतो.याची जाणीव सचिन रमेश कोळी यास पूर्णपणे माहिती असताना तरी देखील शेताच्या कुंपणाच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडलेला आहे. व त्यामुळे विशाल रमेश मेढे याचा विद्युत तारांचा शॉक लागल्याने जागीच मयत झाला आहे.

मयत विशाल रमेश मेढे याच्या प्रेतावर पोलिसांनी दोन पंचासमक्ष पंचनामा केला असून वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय यांनी त्यावर पोस्टमोटेम करून. नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

सचिन रमेश कोळो रा.यावल.ता.यावल
यास सदर शेताचे कुंपणात विद्यूत प्रवाह सोडल्यानंतर सदर तारेच्या कुंपणाचा एखादया इसमास शॉक लागला तर त्या इसमाचा मुत्य होऊ शकतो.
 हे माहित असतांना त्याने बेकायदेशीपणे कोणताही परवाना न घेता तसेच सदर शेतामध्ये कोणताही सूचना फलक न लावता तसेच त्या ठिकाणी कोणताही रखवालदार न ठेवता सदर तारांमध्ये विदयुत प्रवाह सोडल्याने सदर तारांचा विशाल रमेश मेढे यास शॉक लागल्यामुळे तो मयत झाल्याने त्याचे मरणास सचिन रमेश कोळी हाच इसम जबाबदार आहे.

 अशाप्रकारे संचिन रमेश कोळी रा. यावल ता यावल याचे बेजाबदार कृत्यामुळेच विशाल रमेश मेढे याचा मुत्यू झाला असल्याने सचिन रमेश कोळी याचे विरूध्द मयत विशाल रमेश मेढे याचा सख्खा चुलत भाऊ अनिल राजू मेढे यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. 
पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली,पो.राजेंद्र साळुंखे, करीत आहे.





0/Post a Comment/Comments